
*कोरची तालुक्यातील आंबेखारी येथे तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची तालुक्यातील आंबेखारी येथे आज तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रामदास मसराम यांनी खेळांचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील योगदान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान निकाबाई थाट सरपंच ग्रा. पं. टेमली यांनी भूषविले
उद्घाटन सोहळ्यात स्थानिक अधिकारी, शिक्षकवर्ग, पालक, तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्पर्धेत विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धांमधून विजयी विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदर खेळाच्या उदघाटन प्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, हकिमुद्दिम शेख, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष परसराम टिकले, दीपक हलामी, परमेश लोहंबरे, श्रावण मातलाम, शिषुला नरोटे, भारत नरोटे, सियाराम हलामी, धनिराम हिडामी, गटशिक्षणाधिकारी अमित दास, रामसूराम काटेंगे, भारत नुरुटी, सुदाराम सहारे, जुगेल नुरूटी, रमेश नरोटे, संतोष नरोटे, जगतराम नरोटे, रवि नंदेश्वर, कांताराम जमकातन, शिक्षक तावडे, राजेश नैताम व इतर मान्यवर व शिक्षकवृंद, विद्यार्थी तथा गावकरी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते.