चामोर्शीत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० रक्तदात्यांनी निभावली सामाजिक जबाबदारी
चामोर्शी, दि. ०३ एप्रिल:
पूज्य श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मृती दिन, कर्मवीर मा. सा. कन्नमवार जयंती तसेच श्री हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने चामोर्शी येथील नगर पंचायत भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पंकज पेशट्टीवार मित्रपरिवार, बेलदार समाज, शिवभक्त तसेच शिवसेना मदत कक्ष आणि बजरंग दल यांच्या संयुक्त पुढाकारातून पार पडलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात एकूण ५० युवकांनी सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका रत्नप्रभा जुवारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेबीबाई सदूलवार, साईनाथ पेशट्टीवार, विजय पेद्दीवार, दत्तूजी बर्लावर आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात सुधीर गोपावार, आकाश नेवारे, बीक्की करणकर, भूषण ऐलावार, पियुष पेशट्टीवार, सागर सदुलवार यांच्यासह अनेक युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. रक्त संकलनासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन पथकाने विशेष सहकार्य केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राण सरकार, सतीश सोमणकर, पोषक गेडाम, सुधीर भांडेकर, यशवंत कत्रोजवार, चंद्रभूषण वालदे, सुरज नैताम, संतोष कटारे, निलेश रेड्डीवार, दीपक सदुलवार, सुजय शहा, आशिष कार्लेवार, आकाश घागरतवार, स्वयंम पील्लीवार, सृष्टी पेशट्टीवार, प्रवीण नैताम, आशिष संगमवार, उमा गंधमवर, माधवी पेशट्टीवार, रूनल गांडलेवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी “रक्तदान हीच ईश्वर सेवा” असा संदेश देत पंकज पेशट्टीवार यांनी सर्वांचे आभार मानले.
