
*मतपत्रिका पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करून विद्यार्थ्यांना दिली निवडणूक प्रक्रियेची माहिती.*
– *पारबताबाई विद्यालयाचा अनोखा उपक्रम*
*कोरची :- जितेंद्र सहारे*
येत्या काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेची सार्वत्रिक निवडणुका होणार असून, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून, स्थानिक पारबताबाई विद्यालय येथील मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी यांच्या मार्गदर्शनात मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक सुरज हेमके यांनी धुरा सांभाळली.विद्यार्थ्यांची मतपत्रिका पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. सदर निवडणूक घेण्यापूर्वी सहा ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून नामांकन पत्र भरण्यात आले. त्यानंतर त्यांना चिन्ह वाटप करण्यात आले. व त्यांना प्रचारासाठी एक दिवस देण्यात आले. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना मतपत्रिका देण्यात आले. मतपत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, सहल मंत्री असे प्रत्येक मंत्राचे नावे चिन्हासहित मतपत्रिकेवर देण्यात आले. सदर पदासाठी एकूण 28 विद्यार्थ्यांनी आपले नामांकन पत्र भरलेले होते. सदर निवडणूक लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाने पार पाडण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी करून, शाई लावण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षक जीवन भैसारे यांनी केंद्राध्यक्ष आपली भूमिका पार पाडली. तसेच त्यांच्यासोबत मतदान अधिकारी म्हणून शाळेतील शिक्षिका कृष्णामाई खुणे, निर्मला मडावी, महेश चौधरी, तुळशीराम कराडे, पराग खरवडे, वसंत गुरनुले यांनी मतदान अधिकारी म्हणून आपली भूमिका पार पाडली. सर्व विद्यार्थ्यांचे मतदान झाल्यानंतर केंद्राध्यक्ष जीवन भैसारे विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने मतदानपेटी सील करण्यात आली. व दुसऱ्या दिवशी समक्ष सर्व विद्यार्थी समोर मतपेटी उघडण्यात येऊन निकाल घोषित करण्यात आले.
सदर निवडणुकीत मुख्यमंत्री या पदासाठी एकूण चार विद्यार्थी उभे होते. त्यापैकी वर्ग दहावीची विद्यार्थिनी नम्रता कोचे व वर्ग नववीच्या विद्यार्थी दिलशान शेख हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले. तर उपमुख्यमंत्री म्हणून वर्ग नववीची विद्यार्थिनी समीक्षा चंहादे ही निवडून आली. क्रीडा मंत्री म्हणून वर्ग नववीचा विद्यार्थी संय्यम कराडे हा निवडून आला. तर सांस्कृतिक मंत्री म्हणून अनुष्का कुलदीप वर्ग नववी ही निवडून आली. स्वच्छता मंत्री म्हणून मीना घाटगुमर ही निवडून आली. तर आरोग्य मंत्री म्हणून दीक्षा मडावी व व सहल मंत्री म्हणून डेव्हिड घुगवे हे निवडून आले.
निवडून आलेल्या सर्व मंत्र्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन करून शपथविधी घेण्यात आली. व त्या सर्व मंत्र्यांचे कार्य काय काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्य सांभाळणारे शाळेतील शिक्षक सूरज हेमके यांनी दिली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी मुंशीलाल अंबादे, कैलास अंबादे, सुरेश जमकातन यांनी सहकार्य केले.