नागपूर:- चांगल्या अधिकाऱ्यांच्या भरवशावर पारदर्शक प्रशासनाचा कारभार चालतो. पण आपली मनमानी चालवणारे अधिकारी आपल्या व्यवस्थेत काही कमी नाहीत. अशाच एका उपविभागीय अधिका-याला निलंबीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दि. 7 जानेवारी रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
संजयकुमार डव्हळे हे या अधिका-याचे नांव असून ते धाराशिव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापुर्वी ते चंद्रपूरातील गोंडपिपरी येथे उपविभागीय अधिकारी असतांना त्यांची कारकिर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती.धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती. शासन नियमांचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेश धुडकावून लावणे, महिला अधिका- याविरोधात असभ्य वर्तण करणे यासह विविध मुदयांचा ठपका डव्हळेंवर ठेवण्यात आला. दरम्यान या सर्व बाबी लक्षात येताच धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यांचावर कार्यवाहीचा अहवाल आयुक्तांना पाठविला होता. आता याप्रकरणात डव्हळेंना निलंबीत करण्यात आले आहे. त्यांना खाजगी नौकरी वा धंदा करण्यास मनाई करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये उपविभागीय अधिकारी पदावर काम करीत असतांना त्यांनी दादागिरीचे धोरण अवलंबविले होते. कर्मचा-यांना धमकविणे, त्यांना विनाकारण त्रास देणे सुरू केले. याविरोधात धाराशिवच्या तहसिलदार डॉ. मृणाल जाधव यांच्यासह अनेकांनी आंदोलन पूकारले होते. यानंतर याची दखल घेत हि कार्यवाही करण्यात आली आहे. मुजोर उपविभागीय अधिका-यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्याने प्रशासनात आता चांगलीच खळबळ माजली आहे.
चंद्रपूर गोंडपिपरीतील कारकीर्द ठरले होती वादग्रस्त .
संजयकुमार डव्हळे हे चंद्रपूरातील गोंडपिपरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. या दरम्यानही त्यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती. कर्मचा-यावर अंकुश ठेवण्याच्या नावाखाली ते चक्क दादागिरीच करायचे. अनेकांना टारगेट करण्याची त्यांची भूमिका होती. यामुळे त्यांनी अनेकांवर हेतूपुरस्पर कार्यवाहीचे सत्र चालविले होते. आता त्यांचे निलंबन झाल्यांनतर त्यांना हा मोठा दणका मानला जात आहे.