*पारबताबाई विद्यालय येथे विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी*
*कोरची:- जियेंद्र सहारे*
कोरची येथील स्थानिक पारबताबाई विद्यालय येथे सिकलसेल सप्ताह अंतर्गत (दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर) शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर कोरची अंतर्गत, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सिकलसेल तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करून, सिकलसेल तपासणी करण्यात आली. व ज्या विद्यार्थ्यांचा सिकलसेल पॉझिटिव्ह आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग करून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे पाठविले आहे.
विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी सखोल मार्गदर्शन करून स्वच्छते विषयी मार्गदर्शन डॉ.योगिता तुमडाम वैद्यकीय अधिकारी शहरी आयुष्यमान आरोग्य मंदिर यांनी केले. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी आवश्यक बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांतर्गत तपासणी करिता देविका भारतसागर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, राजू भैसा परिचर आदींनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी, व शाळेतील शिक्षक कृष्णाबाई खुणे, निर्मला मडावी, सुरज हेमके, वसंत गुरनुले, जीवन भैसारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी पराग खरवडे, प्रल्हाद बागडेरिया, मुंशीलाल अंबादे यांनी सहकार्य केले.
