एटापल्ली : अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालये व शाळांमध्ये सेवा उपक्रम
एटापल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच गोरगरीब जनतेचे कैवारी आणि युवकांचे प्रेरणास्थान अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली तालुक्यात विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
तालुका काँग्रेस नेते प्रज्वल भाऊ नागुलवार यांच्या नेतृत्वात आणि अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली तालुक्यातील संत चावरा इंग्लिश मीडियम स्कूल, मदर अँड इंग्लिश मीडियम स्कूल, संस्कार पब्लिक स्कूल, ग्रामीण रुग्णालय एटापल्ली, जिल्हा परिषद शाळा जीवनगट्टा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोडीटोला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चंदनवेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालेवारा, वाघेझरी, चौखेवाडा, वडसा खुर्द, दिंडवी, कोंदावाही, पहिमा, बुर्गी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गट्टा येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन, फळे, बिस्किटे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनाही फळे व बिस्किटांचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपणारा सेवा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास आदिवासी विकास महामंडळ, नाशिकचे संचालक सैनूजी गोटा, तालुका प्रमुख नेते तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रज्वल भाऊ नागुलवार, आदिवासी काँग्रेस आघाडीचे तालुकाध्यक्ष सुधाकर गोटा, ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे, संदीप वैरागडे, संतोष कुरसामी, महेश बिरामवार, संतोष बिरामवार, विनोद हिचामी, साई हिचामी, सैनू मठ्ठामी, हालेवारा येथील उपसरपंच संध्याताई कन्नारवार, स्वप्निल कन्नालवार, चोखेवाडा येथील सरपंच लालसुजी नरोटे, वडसा खुर्दच्या सरपंच मंदाताई गेडाम, दिंडवीच्या माजी सरपंच शामलताई मडावी, प्रशांतजी गोटा (गट्टा), सुमित गोटा, निकिता पुंगाटी, रोहिदासजी नरोटे, नरेश गावडे, संजय शेडमाके, सन्नू कोंदामी, संतोष गोटा, कृष्णा नैताम, अविनाश दूधखोडे, अमित भाऊ कत्तीवार, मयूर पदा आणि चैतू पदा यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अजयभाऊ कंकडालवार यांच्या सामाजिक, लोकाभिमुख आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाजसेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
