
आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी येथे ” सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन ” साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे पर्यवेक्षक सन्मानीय घाटबांधे सर, ज्येष्ठ शिक्षक पोलोजी, शिक्षिका दोरशटवार मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्मानीय पिसे सरांनी केले. या कार्यक्रमाचे खरे आकर्षण इयत्ता 5वी ची विद्यार्थिनी आरोही कुकुडकर हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले जयंतीनिम्मित भाषण दिले. शेवटी पर्यवेक्षक सन्मानीय घाटबांधे सरांनी अत्यंत मार्मिक शब्दात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 💐💐💐💐💐