भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळेचे उल्लेखनीय यश
सलग दोन वर्ष विभागीय सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
एटापल्ली :
आदिवासी विभाग, अप्पर आयुक्त आदिवासी विकास नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दि. १३ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान चंद्रपूर येथे उत्साहात संपन्न झाल्या.
या विभागीय स्पर्धांमध्ये चंद्रपूर, भामरागड, अहेरी, गडचिरोली, चिमूर, भंडारा, नागपूर, वर्धा व देवरी या एकूण ९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतील सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड येथील ३३३ खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धांमध्ये भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथील विद्यार्थ्यांनी प्राचार्य धनंजय पोटदुखे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला.
या उल्लेखनीय यशासाठी प्रा. सविता पोटदुखे, प्रा. ममता झिलपे, प्रा. प्रशांत सातपुते, प्रा. एन. डडमल तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड यांनी सलग एकोणविस (१९) वर्षे चॅम्पियनशिप मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. या यशासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमर राऊत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोषना चव्हाण व सहाय्यक प्रकल्प अधिकारी एम. बी. मडावी (भामरागड) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धांचे बक्षीस वितरण नागपूर येथील अप्पर आयुक्त मा. आयुषी सिंह मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजेत्या संघास चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरीचे सचिव तथा माजी मंत्री व आमदार आदरणीय धर्मराव बाबा आत्राम साहेब, संस्था अध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम) तसेच प्राचार्य धनंजय पोटदुखे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
