अहेरी तालुक्यातील येरमनार येथे बिट स्तरीय बाल क्रीडा स्पर्धेचे आयोजन.
गडचिरोली:- मैदानी खेळांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडू नेहमीच चमकदार कामगिरी करीत असतात. बीट स्तरावर होत असलेल्या बाल क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे पर्वणी असून, दर्जेदार खेळाडू तयार करण्याची ताकद या स्पर्धांमध्ये आहे.शालेय पातळीवर होत असलेल्या क्रीडा स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारे पर्वणी आहे. या विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे व्यासपीठ आहे. ग्रामीण भागात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. मैदानी खेळात ग्रामीण भागातील खेळाडूंचा दर्जा कायमच उल्लेखनीय राहिलेला आहे.विद्यार्थ्यांनी दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करावे.स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कुलागुणांना वाव मिळून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते,असे प्रतिपादन तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आशिफखान पठाण यांनी केले.
अहेरी तालुक्यातील येरमनार येथील क्रीडांगणावर बिटस्तरीय क्रीडा संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन संध्या मडावी सरपंच येरमनार, अध्यक्ष म्हणून विजय डोलू आत्राम उपसरपंच येरमनार, यांच्या हस्ते पार पडले.विशेष अतिथी व्येकटेश तलांडे, वनिता शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पोस्ट मास्टर साईनाथ कौशले,सागर वाहुल,बिछु आत्राम, सोमा आत्राम ,गौरूबाई गौवरधन, भारडे केन्द्र प्रमुख पेरमिली, सतीश खाटेकर केन्द्र प्रमुख दामरेंचा, दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक उपस्थित होते.
मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी यांनी शालेय जीवनात शिक्षणासोबत खेळही तेवढेच महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत भाग घेतले पाहिजे. स्पर्धेत प्रत्येक जण जिंकण्यासाठीच भाग घेत असतात. मात्र दोन पैकी एकच संघ कोणता संघ कश्या पद्धतीने खेळला याला जास्त महत्व असते. चांगला खेळ खेळूनही आपण कधी कधी अटीतटीच्या सामन्यात हार पत्करावा लागतो. त्यामुळे खचून न जाता खेळामध्ये सातत्य ठेवण्याचे काम केले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
बिट स्तरीय बाल क्रिंडा संमेलन दामरंचा व पेरमिली या दोन केंद्रातील ४०० हून अधिक विद्यार्थी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला असून ११ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत या ठिकाणी वैयक्तिक व सांघिक खेळ खेळले जाणार असुन मान्यवरांच्या उपस्थितीत पेरमिली व दामरचा या दोन चमूमध्ये कबड्डी सामना रंगला. कार्यक्रमाची रूपरेषा आयोजन येरमनार शाळेतील रहीम खान पठान सोबत सर्व केंद्रातील शिक्षकानी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संतोष चिकाटे तर आभार रहीम खान पठाण यांनी मानले.