
अनेक इमारती उध्वस्त; बचाव कार्य सुरुच.
म्यानमार/थायलंड:– म्यानमारमध्ये शुक्रवारी नंतर शनिवारी दुपारी ३:३० वाजता पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.१ मोजण्यात आली. अशाप्रकारे, गेल्या २ दिवसांत ५ पेक्षा जास्त तीव्रतेचे तीन भूकंप झाले.
शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले. मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो. ही भीती युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने व्यक्त केली आहे. भूकंपाचे धक्के थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतापर्यंत जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत मृतांचा आकडा १,६४४ वर पोहोचला आहे, तर ३,४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि १३९ लोक बेपत्ता आहेत. दुसरीकडे, थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक ३० मजली इमारत कोसळली. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये २०० वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या विध्वंसामुळे म्यानमारच्या सहा राज्यांमध्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली.
म्यानमार येथे युद्ध पातळीवर मदत कार्य केलं जात असून भारताने देखील मदतकार्यासाठी ऑपरेशन ब्रह्माला सुरुवात केली आहे. NDRF च्या ८० सदस्यांची टीम, दोन वायुसेनेची विमान तसेच भरपूर जीवनावश्यक सामग्री म्यानमारला पाठवण्यात आली आहे. सध्या म्यानमार आणि थायलंड येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता दर्शवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. म्यानमारमध्ये शनिवारी दुपारी २.५० वाजता भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी होती. म्यानमारच्या लष्करी नेतृत्वाने सध्याच्या घडीला भूकंपामुळे देशातील मृतांची संख्या १६४४ झाली असल्याचे सांगितले आहे. तर जवळपास ३४०० लोक यात जखमी आहेत. तसेच १३९ लोक अद्याप बेपत्ता आहेत. सध्या या भूकंपाची तीव्रता दाखवणारे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हिडिओ व्हायरल.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे एका गगनचुंबी इमारतीच्या छतावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये एक कपल रोमान्स करत होतं. तर एक व्यक्ती बाहेर खुर्चीवर बसून आराम करत होता. दरम्यान व्यक्तीला भूकंपाचा तीव्र झटका बसल्याचे जाणवले आणि तो एकदम उठून उभा राहिला. तर भूकंपामुळे स्विमिंग पूलमधील पाणी लाटांप्रमाणे उडू लागले. हे पाहून स्विमिंग पूलमध्ये रोमान्स करणार कपल घाबरलं आणि ते स्विमिंग पूलमधून लगेचच बाहेर आले.
भूकंपाच्या वेळी बैंकॉकमध्ये महिलेने रस्त्यावर बाळाला दिला जन्म.
थायलंडमधील विनाशकारी भूकंपाच्या वेळी बँकॉकमधील डॉक्टरांनी रुग्णालयाबाहेर रस्त्यावर एका बाळाची प्रसूती केली.भूकंप झाला तेव्हा ती महिला बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेली होती. यानंतर डॉक्टरांना रुग्णालय रिकामे करावे लागले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यामध्ये, महिला स्ट्रेचरवर पडून आहे तर रुग्णालयातील कर्मचारी तिला मोकळ्या जागेत प्रसूतीमध्ये मदत करत आहेत.
थायलंडमध्ये इमारतीच्या ढिगाऱ्यातून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले.
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपानंतर बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. यापैकी आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बँकॉकच्या डेप्युटी गव्हर्नरने सांगितले की, बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींमधून १०१ लोक बेपत्ता आहेत.
म्यानमारमध्ये भूकंपानंतर आणखी १४ भूकंपाचे धक्के.
शुक्रवारी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये किमान १४ भूकंपाचे धक्के बसले आहेत, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार. बहुतेक भूकंपाची तीव्रता ५ पेक्षा कमी होती. सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का ६.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता जो मोठ्या भूकंपानंतर सुमारे १० मिनिटांनी बसला.