पत्रकार असिफ खान पठाण व श्रीकांत दुर्गे यांना राज्याचे माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांचे कडून सत्कार.
अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथे राजे फाउंडेशन पेरमिली द्वारा “पाठीराखा” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. या नाट्यप्रयोगाचा उद्घाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते पार पडण्यात आले आहे.तसेच एकता नाट्य कला मंडळाच्या संकल्पनेतून नेहमीच वेगवेगळ्या रूपरेषा दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो, सत्कार म्हणजे कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा संस्था, संघटना किंवा समाजाकडून सन्मान करणे होय. अशाच काल झालेल्या नाटकाचा नाट्य प्रयोगात मा. आशिफभाऊ पठाण तालुका पत्रकार उपाध्यक्ष, व तडपदार पत्रकार श्रीकांतभाऊ दुर्गे ह्यांचा हा सन्मान सहसा शाल, श्रीफळ, देऊन करण्यात आला जे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून आज गावात रुजते, सत्कारामुळे व्यक्तीला प्रोत्साहन मिळते आणि समाजाला प्रेरणा मिळते, तर सत्कार समारंभ कौतुक आणि आदराचा सोहळा घेण्यासाठी नेहमीच राजे फाउंडेशन व एकता नाट्य कला मंडळ नेहमीचं आपल्या सोबत राहू असे मंडळाकडून बोलण्यात आले आहे.
