३ फेब्रुवारी ला पारंपारीक पेरमिली इलाका पट्टी व पेरमिली (कोडसेलगुडम) यांचे वतीने सल्ला शक्तीचे अनावरण व कोया पुनेम गोंडी धर्म सम्मेलन.
पेरमिली(गडचिरोली):- पारंपारीक पेरमिली इलाका पट्टी व पेरमिली (कोडसेलगुडम) यांचे वतीने सल्ला शक्तीचे अनावरण व कोया पुनेम गोंडी धर्म सम्मेलन कार्यक्रम ३ फेब्रुवारी रोजी अहेरी तालुक्यातील पेरमिली (कोडसेलगुडम) गोटुल भुमी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
उद्घाटक व कार्यक्रमाचे ध्वजारोहक राजे अम्ब्रीशराव आत्राम माजी पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सहउद्घाटक अवधेश्वर आत्राम युवा नेते, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमिली, सहअध्यक्ष किरण नैताम सरपंच पेरमिली यांची उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार दीपकदादा आत्राम, माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर), अजयभाऊ कंकडालवार (माजी अध्यक्ष जि.प. गडचिरोली), हनमंतु मडावी (काँग्रेस नेते), डॉ. गणेश मडावी त्यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी गावडे (माजी सरपंच, येरमनार), सांबया करपते माजी सरपंच कमलापूर, ऋषी पोरतेट माजी जी.प. सदस्य , कैलाश कोरेत (सामाजीक कार्यकर्ता), संजय सडमेक (पेरमिली पट्टी घडी शेंड्या), बापू सडमेक, विठ्ठल मेश्राम(गावपाटील), निलेश वेलादी (सरपंच मेडपल्ली), संदिप गावडे (पले) तसेच इलाका पट्टीतील सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व कोतवाल तसेच सर्वे विभागातील कर्मचारीवृंद व सर्व पत्रकारवृंद.
कार्यक्रमाची रूपरेषा
३ फेब्रुवारी २०२६
सकाळी १०.३० वाजता
मुठपुजा (गाँगो पुजा) तुकाराम गुडी शेडमाके (धनुर) अखिल गोंडवाना भूमक सेवासंघ उपशाखा गडचिरोली (जिल्हा अध्यक्ष), सैदव गणपत मजानी (धर्मापूर),
सकाळी ११.३० वाजता
गोंडी धर्म सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रम
दुपारी १२.०० वाजता
सल्ला शक्तीचे अनावरण व कोया पुनेम (गोंडी धर्म) सम्मेलन व मार्गदर्शन कार्यक्रम होईल.
सल्ला शक्तीचे अनावरण व कोया पुनेम गोंडी धर्म संमेलन कार्यक्रमास पेरमिली इलाका पट्टीतील नागरीक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक पारंपारिक पेरमिली इलाका पट्टीतील पेरमिली(कोडसेलगुडम) ग्रामसभा त्यांनी केले आहे
