पेरमिली परिसरात अवैध देशी दारूचा महापूर; गडचिरोली पोलीस दलाने अवैध दारूविक्रेत्यांना दिला दणका; पेरमिलीतील चंद्राटोला येथे २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पेरमिली (गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली परिसरात अनेक दिवसापासून अवैद्य बनावटी देशी दारू विक्रीला उधान आले असून परिसरात खुलेआम दारूविक्री होत असल्याची चर्चा सुरू आहे. पोलीस विभागाने याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली उप-पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करत मोठी कारवाही केली आहे. यामुळे परिसरातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
१८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ ते ४:३० च्या सुमारास गुप्त च्या आधारे पेरमिली हद्दीतील चंद्राटोला येथील एका घरात पेरमिली पोलिसांनी धाड टाकला. सदर झडतीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला. यामध्ये देशी दारू (रॉकेट संत्रा): ४,००० निपा (४० पेट्या) – किंमत ₹२,२०,०००/-
विदेशी दारू (रॉयल स्टॅग): ९६ निपा – किंमत ₹२४,०००/-
बिअर (हेवर्ड्स ५०००): २४ टिन – किंमत ₹९,७२०/-
असा एकूण २,५३,७२० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश महाजन, पोलीस हवालदार आशा मडावी, सुधाकर मडावी, पोलीस शिपाई संजय टोकलवाड आणि अरुण आदे यांच्या पथकाने केली.
या प्रकरणी आरोपी असलेल्या पेरमिली गावातील एका युवका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेरमिली चे पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करत आहेत.
