*कोरची -मोहगाव नजीक भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी*
*-ट्रॅक्टरला सुसाट येणाऱ्या ट्रकने मागून दिली जोरदार धडक*
*कोरची :-* कोरची वरून 2किमी अंतरावरील मोहगाव जवळ कुरखेडा तालुक्याच्या चांदागड येथून एम. सत्यनारायण कंपनीच्या मृद व जलसंधारण विभागाकडून सुरु असलेल्या कोरची तालुक्यातील झेंडेपार येथे बंधाराच्या कामानिमित्त लोखंडी साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोहगाव नजीक मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की जागीच एका कामगाराचा मृत्यू झाला. मयत झालेल्या कामगार सागर कल्लो वय 20वर्ष चांदागड तर दुसरा कामगार कैलास कोवे वय 35 वर्ष वाकडी यांचे रुग्णालयात घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाले. तर प्रदीप नैताम 24वर्ष चीचटोला, राजेश गंगाभोईर वय 28वर्ष चिंचगाव यांचा हात फॅक्चर झालेला असून,चालक पुरुषोत्तम मडकाम वय 51वर्ष गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती प्राप्त होतात 108 रुग्णवाहिकेला दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आले परंतु दोन तीनदा संपर्क करून सुद्धा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही यामुळे एका खाजगी वाहनाने पोलीस विभागाच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे अपघातग्रस्त रुग्णांना भरती करण्यात आले.
हैदराबाद येथून रायपूर कडे दगडांची चुरी घेऊन जाणारा ट्रक क्रमांक CG07BA9284 ट्रक चालक अभिषेक शर्मा उत्तरप्रदेश चितवाडा जिल्हा बालिया वय 30वर्ष हा सुसाट पणे येत असताना दिनांक २१ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोरची मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर सदर अपघात घडला. अपघात झाल्यावर ट्रक चालक प्रसार होण्याचा प्रयत्न करीत असताना. पोलिसांनी लावलेल्या तपासणी नाक्यादरम्यान सदर ट्रकला अडवण्यात पोलिसांना यश आले असून अभिषेक शर्मा असे ट्रक चालकाचे नाव असून पुढील तपास कोरची पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे करीत आहेत
जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आहे.
