महाशिवरात्रीनिमित्त लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून भव्य महाप्रसाद वाटप
एटापल्ली व तूमरगुंडा येथे शेकडो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
एटापल्ली : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे विविध ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला.
एटापल्ली येथील शिवाजी महाराज चौक, चेकिंग नाका एटापल्ली तसेच तूमरगुंडा येथील महादेव मंदिर परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
विशेष म्हणजे चेकिंग नाका एटापल्ली येथे महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ पत्रकार संघटना एटापल्ली यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार, सचिव तनुज बल्लेवार, जनार्दन नल्लावार उपस्थित होते. तसेच लॉयड्स मेटल्स कंपनीचे प्रसाद नामेवार, बंटी असुटकर, मिथुन जोशी, स्वप्निल आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भाविकांना सेवा देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
