डॉक्टरेट सन्मानाने अजय कंकडालवारांचा गौरव; गडचिरोलीच्या विकासकार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
गडचिरोली | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. हा सन्मान नवी दिल्ली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्कार सोहळा ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल यांच्या वतीने सम्राट हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौथर्न अमेरिकन युनिव्हरसीटी कडून कंकडालवार यांना सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
गडचिरोली जिल्हा तसेच अहेरी विधानसभा क्षेत्र येथे त्यांनी केलेली विकासकामे, दुर्गम भागातील सेवा उपक्रम आणि लोकहिताच्या योजनांमध्ये दिलेले योगदान याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
सेवाभावी व निःस्वार्थ समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या कंकडालवार यांच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढला असून राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वंचित घटकांसाठी सातत्याने कार्य करत विकासाचा वेग वाढविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची ही मोठी पावती मानली जात आहे.
