गुन्हा दाखल होताच शिक्षक फरार.
जया लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
दारव्हा(यवतमाळ):- तालुक्यातील जवळा ब्रम्हनाथ येथील जि. प. प्राथमिक शाळेवर कार्यरत शिक्षकाने शाळेतीलच अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची घटना शनिवार १६ नोव्हेंबर च्या सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विकृत आरोपी शिक्षक घनश्याम चव्हाण (४५) रा. घाटकिन्ही याने त्याच शाळेत शिकणारी सातव्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या कार्यालयात साफसफाई करायची आहे असे म्हणून बोलावले. त्यानंतर या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही बाब पीडित विद्यार्थिनीने घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितली. त्यावरून विद्यार्थिनीचे पालक रा, जवळा ब्रम्हनाथ यांनी दारव्हा पोलिसात फिर्याद दिल्यावरून दारव्हा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षक घनश्याम चव्हाण हा फरार झाला असून पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहे.
शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र या घटनेचा रोष निर्माण झालेला आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी मुली असुरक्षित असल्याचा भावना आता पालकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे घटनेची सखोल चौकशी व्हावी व आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे