
परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांनी शेतात एकटे जाऊ नये:- सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे.
पेरमिली(गडचिरोली):– येरमनार -कोडसेपल्ली गावाच्या हद्दीत वाघ फिरताना दिसून आल्याचे चर्चा सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाला तातडीने कळवले आहे. गावकऱ्यांची एकच मागणी आहे की, वाघाला सुरक्षितरीत्या जंगलात परत पाठवावे व गावाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत. नागरिकांनी शेतात एकटे जाऊ नये, रात्री सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे यांनी केले आहे