अमिर्झा व आंबेटोला येथे क्रांतीविर बाबुराव शेडमाके जयंती उत्साहात साजरी; ‘जय सेवा’ च्या घोषणांनी परिसर दणाणला
क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांचे कार्य राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे – अरविंदभाऊ कात्रटवार
गडचिरोली (प्रतिनिधी) :
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अरविंदभाऊ कात्रटवार मित्रपरिवाराच्या वतीने अमिर्झा व आंबेटोला येथे आयोजित कार्यक्रमात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘जय सेवा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
यावेळी मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, क्रांतीविर बाबुराव शेडमाके हे १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील गोंडवाना भागातील थोर आदिवासी क्रांतीविर होते. त्यांनी आदिवासी बांधवांना संघटित करून इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आवाज उठविला आणि त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचे बलिदान आणि संघर्ष आजही राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे आहे.
पुढे बोलताना कात्रटवार म्हणाले की, आजच्या युवा पिढीने क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची गरज आहे. जनसेवक म्हणून मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास तसेच आदिवासी बांधवांसह सर्व समाज घटकांच्या प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, दीपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयुर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
