प्रतिनिधी: जनार्दन नल्लावार एटापल्ली
अहेरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर; सत्यपाल कुत्तरमारे व मणीकंठ गादेवार यांच्या हस्ते नियुक्ती
एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने पाच तालुक्यांत पदाधिकाऱ्यांची निवड — गरजू रुग्णांना मोफत उपचार व योजनांसाठी मार्गदर्शन
अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जिल्हा संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे आणि जिल्हा अध्यक्ष मणीकंठ गादेवार यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या पाचही तालुक्यांमध्ये तालुका प्रमुख व उपप्रमुखांची निवड करून कार्यकारणी गठित करण्यात आली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मणीकंठ गादेवार यांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांतील राखीव खाटा उपलब्ध करून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रियांसाठी सहकार्य करणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करावेत.
जिल्हा संपर्क प्रमुख सत्यपाल कुत्तरमारे यांनी सांगितले की, गंभीर व महागड्या शस्त्रक्रियांसाठी गरजू रुग्णांना पंतप्रधान व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी तसेच सिद्धिविनायक ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क ठेवावा.
कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
