
*कोरची येथील नराधमाने केले 14 वर्षीय नाबालिक मुलीचे यौन शोषण*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
कोरची येथील आरोपी मनीष भोयर वय 21 रा. कोरची या आरोपीने पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत अतिप्रसंग केले. पीडितेची आई व वडील मच्छीकंपनीत विजयवाडा येथे रोजी मजुरीसाठी गेले असता पीडिता ही आपल्या मावशी च्या घरी राहत होती पीडितेला भुलथापाने घरी बोलावून तिच्यावर आरोपीने अतिप्रसंग केले.
पीडितेने दिलेल्या माहितीप्रमाणे पीडितेची मावशी ही शौचासाठी बाहेर गेली असता आरोपी मनीष भोयर यांनी तुझा काका तुला बोलावीत असल्याचे सांगून आपल्या घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेचे कपडे रक्ताने माखलेले होते व मुलीने घरी आल्यावर आपल्यावर अत्याचार झाले असल्याची माहिती आपल्या मावशीला दिली. याबाबतची माहिती पोलीस स्टेशन कोरची येथे देण्यात आली. पोलिसांनी आरोपी मनीष भोयर याला अटक केली व सध्या आरोपी व पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी कुरखेडा येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.