*तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा गट्टा ने मिळवले यश*
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कला संमेलनाचे आयोजन दिनांक २,३ आणि ४ जानेवारी २०२५ रोजी मौजा एटापल्ली येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील एकूण अकरा केंद्रांनी व चारशे हून अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलींचा व मुलांचा कब्बडी, खो – खो , व्हॉलीबॉल आणि वैयक्तीक स्पर्धा, सांस्कृतिक कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटनिय सामना मुलांचा कबड्डी केंद्र गट्टा विरुद्ध केंद्र सुरजागड यांच्यामध्ये रंगला. प्राथमिक कबड्डी मुले उत्पांत फेरीतील सामना गट्टा विरुद्ध कसनसुर अटीतटीचा व तीनदा बरोबरीत सुटला. व्हॉलीबॉल ( माध्यमिक) , खोखो (माध्यमिक) , कबड्डी, खोखो (प्राथमिक) ,६०० मीटर दौड, ३०० मिटर दौड या खेळांमध्ये चषक मिळवून गट्टा केंद्राने प्रेक्षकांची मने जिंकले. विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक श्री बेडके सर, विषय शिक्षक महात्मा नैताम सर, सहाय्यक शिक्षक वसंत मडावी सर, शंकर नरोटी सर, प्रकाश दुर्वे सर, महेश टेकाम सर, सीमा उईके मॅडम, स्वयंसेवक प्रशांत झरकर सर यांच्यासह शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गोविंद शहा, उपाध्यक्ष दिलीप दागावकर आणि संपूर्ण शाळा व्यवस्थापन समितीने मेहनत व वेळोवेळी मार्गदर्शन केले. आता गट्टा या केंद्राचे लक्ष जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवण्याकडे लागले आहे. संपूर्ण परिसरात जिल्हा परिषद शाळा व तेथील विद्यार्थी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.