*माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली,लगाम चेक येथे ‘माता मंदिर’ बांधकाम भूमिपूजन उत्साहात संपन्न.!*
*मुलचेरा:-* तालुक्यातील चुटूगूंट्टा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लगाम चेक येथे माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.
यामुळे परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची अपेक्षा अखेर पूर्ण होत असून येथील माता मंदिर बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न झाले.या पवित्र विधीला स्थानिक लोकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव महाराज यांचे थेट मार्गदर्शन लाभले असून,यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
स्थानिक विकासकामांबाबत नेहमीच पुढाकार घेणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी या मंदिर बांधकामाच्या उपक्रमाची पुढाकाराने धुरा सांभाळली.त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प आकार घेत असून स्थानिक नागरिकांकडून याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
भूमिपूजन विधी मंत्रोच्चार व धार्मिक विधींसह पार पडला.उपस्थित मान्यवरांनी माता मंदिर उभारणीमुळे परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक बळकट होईल,तसेच भाविकांसाठी एक केंद्रस्थळ निर्माण होईल,असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ उरेते,प्रफुल नागूलवार,सरपंच साधना मडावी,पोलीस पाटील प्रेमकला पेंदाम,हनुमंतू आत्राम,जयराम दाडजाम, गोपाळ पेंदाम,रामदार कनके,मारोती आत्राम,मधुकर पेंदाम,मोहन गेडाम,मनोज पेंदाम,नीलकंठ आत्राम,दिलीप चाहकाटे,कविता आत्राम,वंदना आत्राम, निरूपा सिडाम,शारदा आत्राम,अशोक आत्राम, किशोर आत्राम,किशोर सिडाम तसेच ग्रामस्थ,महिला मंडळे,युवकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
