
कंत्राटदाराने केलेल्या कामांचे देयके तीन वर्षापासून प्रलंबित ठेवणाऱ्या दहा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी.
योगाजी कुडवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहा ग्रामपंचायतील प्रकार.
गडचिरोली:- जिल्हयातील पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या एकूण 10 ग्रामपंचायतीत गडचिरोली येथील कंत्राटदाराने रीतसर टेंडरद्वारे विकास कामे करूनही तीन वर्षापासून देयके प्रलंबित असल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. कंत्राटदाराला देयके न देणाऱ्या दहा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आदर्श समाज विकास सेवा संस्थाचे अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली व जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सेवारी, कसनसूर, सरखेडा, दिंडवी, कोहका, मेढरी, गर्देवाडा, जांभीया, जवेली बुज, वांगेतूरी असे एकूण 10 ग्रामपंचायत मध्ये गडचिरोली येथील दत्त ट्रेडर्स चे कंत्राटदार यांनी सदर ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा नळ योजनेचे कामे, घनकचरा व्यवस्थापन,नवीन हात पंप खोदने तसेच सोलर पंप बसविणे असे एकूण 15 कामे कामे रीतसर टेंडर द्वारे करण्यात आले. सदर कामे सन 2021-22 व 2022-23 या वर्षी पूर्ण करण्यात आले.
सदर कामे ग्रामपंचायत च्या gpdp आराखड्यात मंजूर आहेत. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी सदर कंत्राटदाराचे देयके अदा करणे आवश्यक होते ,परंतु सदर कामे होऊन तीन वर्ष लोटून सुद्धा सदर ग्रामसेवक यांनी सदर रक्कम दुसऱ्या कामावर खर्ची करून कंत्राटदार यांचे आर्थिक नुकसान केलेले आहे.त्यामुळे कंत्राटदार मोठ्या अडचणीत सापडला आहे. कंत्राटदारावर झालेल्या अन्यायाची चौकशी करून संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनची कारवाई करण्यात यावी व कंत्राटदाराला केलेल्या कामाचे देयके ग्रामपंचायत मार्फत अदा करण्यात यावे,
तरी या संबंधाने येत्या 15 दिवसामध्ये संबंधित दोषी ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई न झाल्यास व कंत्राटदाराचे देयके न मिळाल्यास लोकशाही पद्धतीने दि.15 मे रोजी जिल्हा परिषद गडचिरोली येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा योगाजी कुडवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.