शेकाप भूमिपुत्रांच्या हक्कांची लढाई लढणार : भाई रामदास जराते
धन्नूर पर्यटन स्थळी मुलचेरा तालुका आठावा बैठक संपन्न
मुलचेरा : खाणी आणि लोह प्रक्रिया प्रकल्पांसाठी भूलथापा देवून दंडुक्याच्या जोरावर जंगल आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचे प्रयत्न जिल्ह्यात वाढत असून मुठभर भांडवलदारांच्या नफ्यासाठी अन्याय केला जात आहे. भूमिपुत्रांच्या जमीनी लाटून करण्यात येणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्ष सातत्याने आवाज उठवत आला असून यापुढे भूमिपुत्रांच्या हक्कांची व्यापक लढाई लढणार असल्याचे ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली.
धन्नूर पर्यटन तलाव केंद्रात शनिवारी पक्षाची संघटनात्मक आठावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, तालुकाध्यक्ष चिरंजीव पेंदाम, जिवनकला कुसनाके, कल्पना सडमाके प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीचे विस्तार करण्यात आला. यात तालुका समितीचे सदस्य म्हणून शांताराम तोडसाम, मिथुन कुळमेथे, किर्तीमंतराव आत्राम, कार्तिक पिल्लेलवार, मधुकर आत्राम, भैय्याजी कडते, मनोज सिडाम, दिलीप मेश्राम, रुपाली रामटेके, कालिदास चौधरी, साईनाथ उरेते, महेंद्र आत्राम, अनिल गावळे, विष्णू मिस्त्री, ईश्वर आलाम, नरेश गोमासे, नान्टू मिस्त्री, शंकर रामटेके, निलकंठ आत्राम, पवित्र सम्मदार, सुरज मडावी, विनोद कन्नाके यांची निवड करण्यात आली.
यावेळी पत्रू नैताम, प्रदिप सेडमाके, अशोक सिडाम, सदाशिव कुळमेथे, भास्कर मडावी, महेंद्र रामटेके, काशिनाथ मडावी, राम वेलादी, श्रीराम आत्राम, रवींद्र मडावी, नारायण पेंदाम, भगवान आत्राम, साईनाथ मडावी, अक्षय सेडमाके, मोहनदास कुसनाके, भैय्याजी सेडमाके, अंबादास कुसनाके, साईनाथ सेडमाके, रवींद्र वनकर, साई बर्लावार, भैय्याजी नैताम, महेश मडावी, रमेश गावळे, संतोष मडावी, सत्यजित राॅय यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
