
निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम
पेरमिली:– अहेरी तालुक्यातील पेरमिली या गावातील तलावात मगर आढळल्याने खळबळ उडाली आहे. पेरमिली गावाच्या मध्यस्थानी सौंदर्य रूपक मामा तलाव असून या तलावात दरवर्षी मासेमारी करण्यात येते.
दिनांक 23 ऑगस्ट रोजी काही युवक तलावा जवळून फिरत असताना तलावात मधोमध असलेल्या काठावर एक मोठा मगर आढळले. या तलावाला लागूनच काही घरे असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या तलावात तीन वर्षांपूर्वी सुद्धा मगर आढळले होते. त्यावेळी वन विभागाकडून सतर्क राहण्याच्या इशारा सुद्धा करण्यात आले होते. आता अजून या तलावात मगर आढळल्याने वन विभागाने यावर काही तोडगा काढण्याची मागणी पेरमिली गावातील नागरिकांनी केली आहे.