जितेंद्र सहारे कोरची प्रतिनिधी
*खोटी माहिती देऊन वनविभागाने वनमंत्र्यांची केली दिशाभूल – आमदार रामदास मसराम*
*खोटी माहिती देणाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी*
*कोरची :-* तालुका मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवरगाव येथे 2024 मध्ये वनपरिक्षेत्र कार्यालय बेडगाव येथील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे यांच्या कार्यकाळात वनविभागातर्फे बांधलेला बंधारा हा अवघ्या एका महिन्यातच वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते आणि याबाबतची बातमी प्रकाशित करतात अवघ्या पंधरा दिवसात नवीन बंधाऱ्याचे बांधकाम अशा ठिकाणी करण्यात आले ज्या ठिकाणी त्याचा उपयोग उन्हाळ्यात वन्यप्राणी, पशुपक्षी तसेच शेतकऱ्यांना होणार नसल्याचे दिसून आले.
याबाबतची तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना केली असता आमदार मसराम यांनी 18 मे 2015 ला सदर बंधाऱ्याला भेट देऊन केलेल्या तक्रारीची खातरजमा गावकर्यांसोबत जाऊन केली.
याबाबत आमदार मसराम यांनी अधिवेशनात वनमंत्री गणेश नाईक यांनी नवरगाव येथे वन विभागाने बांधलेला बंधारा एका महिन्यात वाहून गेल्याची घटना माहे एप्रिल, २०२५ मध्ये निदर्शनास आली तसेच सदर बंधाऱ्यांचे काम गुणवत्तापूर्वक न करता अनेक ठिकाणी बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे निदर्शनास आले व नवीन बंधारा योग्य ठिकाणी बांधला गेला नसल्यामुळे तसेच सदर बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधारा तुटून येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले असून याबाबतची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार मसराम यांनी अधिवेशनात वनमंत्र्यांकडे केली होती.
वनविभागाने व्यवस्थितपणे बंधाऱ्याचे बांधकाम गुणवत्तापूर्वक केला असून सदर बंधारा जंगलातील नाल्याजवळ योग्य ठिकाणी बांधल्यामुळे वन्यप्राणी व पशुपक्षी यांना फायदा होणार असल्या चे वनमंत्र्यांनी आमदार रामदास मसराम यांना दिलेल्या उत्तरावरून असे निदर्शनास आलेले आहे की वनमंत्री गणेश नाईक यांना वनविभागाने खोटी माहिती देऊन वनमंत्रांची दिशाभूल केलेली आहे तरी सदर विषय अतिशय गंभीर असून याबाबतची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.
*कोट*
2024 मध्ये बांधकाम करण्यात आलेला बंधारा निकृष्ट दर्जाच्या असून अवघ्या एका महिन्यातच वाहून गेलेला होता व त्यानंतर वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनंतर पंधरा दिवसात दुसरा बंधारा बांधकाम करण्यात आला तो सुद्धा गुणवत्ता पूरक नसून योग्य त्या ठिकाणी बांधकाम करण्यात न आल्यामुळे त्याचा फायदा शेतकरी, पशुपक्षी यांना होणार नसल्याचे दिसून येत आहे
*श्यामकुमार यादव*
*गावकरी, नवरगाव*
याबाबत मला कल्पना नसून वन विभागाने दिलेली माहिती खरी असावी तरी मी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर प्रकरणाबद्दल माहिती घेऊन कळविणार
*जोजिन जॉर्ज*
*उपविभागीय वन अधिकारी*
*कुरखेडा स्थित वडसा,’ वनविभाग वडसा*
