
सौदी अरेबिया:- हज यात्रेकरुसांठी एक धक्कादायक बातमी आहे. सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर व्हिसा बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या निर्णयामुळे व्यापार, कौटुंबिक भेटी आणि उमराह व्हिसावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे. हज यात्रेसाठी नोंदणी न करता येणाऱ्या यात्रेकरुंना रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.ही व्हिसा बंदी अस्थायी स्वरुपाची आहे. हज यात्रेच्या हंगामापर्यंत म्हणजे जूनच्या मध्यापर्यंत ही व्हिसाबंदी लागू करण्यात येणार आहे. हज यात्रनंतर व्हिसा प्रक्रिया पुन्हा पूर्ववत केली जाणार असल्याचे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
13 एप्रिल नंतर प्रवेश बंदी.
परदेशी नागरिकांना 13 एप्रिलपर्यंत उमराह व्हिसावर देशात प्रवेश करण्यास परवानगी आहे. 13 एप्रिलनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीत सुमारे 1000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्य झाला होता. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे यात्रेसाठी आलेल्या लोकांचा समावेश होता.
दरवर्षी लाखो मुस्लिम आणि श्रद्धाळू लोक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी जातात.इस्लामच्या पवित्र स्थळांपैकी एक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात भाविकांची प्रचंड गर्दी जमते. यामुळे सुरक्षितता आणि व्यपस्थापन सुलभ करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारने कठोर निर्णय घेत व्हिसा बंदी लागू केली आहे.
व्हिसा बंदीचा परिणाम.
सौदी अरेबियाच्या या व्हिसाबंदीच्या निर्णयाने भारत, बांगलादेश, पाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, नायजेरिया, इराक जॉर्डन अल्जेरिया, सूदान इथियोपिया ट्युनिशिया आणि येमेन या देशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे हजारो भाविकांच्या योजना प्रभावित होण्याची शक्यता आहे.
व्हिसा बंदीचा निर्णय प्रवास अधिक सुलभ आणि नियंत्रित.
सौदी अरेबियाच्या परराष्ट्री मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, व्हिसा बंदीचा निर्णय प्रवास प्रक्रिया अधिक सुलभ आणि नियंत्रित करण्यासाठी घेण्यात आला आहे. यामुळे हज यात्रेकरुंसाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर अनुभव प्राप्त होईल. हा निर्णय तात्पुरता घेण्यात आला आबे. भाविकांना नोंदणी करुनच हज यात्रा करण्याचे आवाहन सौदी अरेबियाच्या सरकारने केले आहे.