📰 मुख्य हेडलाईन :
काटेपल्लीत माता मंदिराचे भव्य लोकार्पण; डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची समाजसेवेची नवी ओळख
पोचम्मा देवी बोनालू उत्सव व सामूहिक विवाह सोहळा जल्लोषात,स्वखर्चातून मंदिर उभारून गावकऱ्यांची वर्षानुवर्षांची गरज पूर्ण
🗞️ अहेरी (प्रतिनिधी) :
तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काटेपल्ली येथे माता मंदिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याने गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावात माता मंदिर नसल्यामुळे धार्मिक, सामाजिक तसेच वैयक्तिक कार्यक्रमांपूर्वी पूजा-अर्चना करण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन डॉ. कंकडालवार यांनी स्वखर्चातून मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे मंदिराचे बांधकाम पूर्ण करून ते ग्रामस्थांच्या सेवेत अर्पण केले.
मंदिराच्या उद्घाटनानंतर पोचम्मा देवीचा पारंपरिक बोनालू उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी लागणारा संपूर्ण खर्चही डॉ. कंकडालवार यांनी उचलला. याच निमित्ताने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात नवदांपत्यांना विविध भेटवस्तू देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच लक्ष्मण कन्नाके, उपसरपंच हरीश गावडे, ग्रामपंचायत सदस्य महेश लेकूर, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, संजय गोंडे, ग्रामपंचायत अधिकारी दुर्वे मॅडम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, श्रीनू राऊत, जगन्नाथ मडावी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी “माता मंदिरामुळे आता प्रत्येक धार्मिक व सामाजिक कार्याची सुरुवात गावातच होणार,” अशी भावना व्यक्त करत डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांचे मनापासून आभार मानले.
