
गडचिरोली:- अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मेडपल्ली येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मडावी च्या कारभाराप्रती तलवाडा येथील पेसा समिती व नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून योग्य कारवाईची मागणी केली आहे.
सदरहू तक्रारीची प्रत त्यांनी योग्य कारवाईस्तव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पांड्या आणि जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना ही दिली आहे.गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत मागील एक वर्षांपासून पेसा समितीची बैठक बोलाविली नाही. ग्रामसेवकाला काही विचारणा केली असता ते उद्धट रीतीने बोलून नागरिकांना अपमानित करीत असतात.येथील ग्रामसेवक मुख्यालय हजर राहत नसल्याने आम्हाला कागदपत्राकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे. पेसा समितीचे सदस्यांना व ग्राम पंचायत सदस्यांना उडवा-उडवीचे उत्तरे देत कोणासोबत ही अरेरावी भाषा वापरत असतात. असे अनेक आरोप ग्रामसेवक मडावी यांच्या विरुद्ध केले आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात केलेल्या संपूर्ण कारभाराचे चौकशी करण्याचे मागणी सुद्धा केली आहे. या संदर्भात जिल्ह्याचे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांना ग्रामसेवक मडावी विरुद्धची तक्रारीची प्रत सादर करून ग्रामसेवकाविरुद्ध उचित कारवाई साठी संबंधित अधिकाऱ्यांकडे योग्य पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी अजय कंकडालवार यांनी योग्य सहकार्याचे करण्याचे आश्वासन देत पेसा समिती अन गावाकऱ्यांकडून तेथील समस्या जाणून घेतले.
नागरिकांना अरेवारी भाषा करणाऱ्या ग्रामसेवक कारवाई होणार काय?
अहेरी तालुक्यातील मेडपल्ली ग्रामपंचायतीत ग्रामसेवक मुख्यालय हजर राहत नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत येथे काही काम करिता गेलेल्या नागरिकांना अरेवारीची भाषा करून अपमानित करीत असल्याचा आरोप तलवाडा येथील नागरिकांनी केली आहे.
ग्रामसेवकाचा संपूर्ण कारभाराची चौकशी होणे आवश्यक.
मेडपली येथील ग्रामसेवकाच्या कारकिर्दीत झालेल्या संपूर्ण कारभाराची चौकशी होणे गरजेचे असल्याचे या ग्रामपंचायतील नागरिकांनी केली आहे. संपूर्ण कारभाराची चौकशी झाल्यास सगळा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याचे नागरिकांनी बोलले आहे.
ग्रामसेवक तर अज्जू भाऊचा माणूस?
मेडपल्ली येथील ग्रामसेवक यांची संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या ग्रामपंचायतील काही नागरिकांनी तर ग्रामसेवक हा अजुभाऊ चा माणूस आहे. त्यांचा कोणी वाकडा करू शकणार नाही. या शब्दात बोलले आहेत.