अहेरी:- अहेरी तालुक्यातील उप पोस्टे व्यंकटापुर येथे दि.२६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात उप पोस्टें व्यंकटापुर हद्दीतील अक्षय पोरतेट आवलमारी सरपंच, चिरंजीव चिल्लेवार उपसरपंच आवलमारी,शासकीय आश्रम शाळेचे सर्व कर्मचारी वृंद,जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद व ईतर शासकीय विभागाचे कर्मचारी, हद्दीतील सर्व पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उप पोस्टे व्यंकटापुर येथे तैनातीस असलेले सर्व अधिकारी अंमलदार व गट 01 पुणे येथील एस.आर.पी.एफ. गृप चे अधिकारी अंमलदार उपस्थित होते.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम उप पोस्टे व्यंकटापुर चे प्रभारी अधिकारी अजिंक्य जाधव यांच्या हस्ते पार पडला.राष्ट्र ध्वजाला एस आर पी गट क्र 01पुणे चे Asl/ पि. बी. सोनवने यांच्या नेतृत्वात सलामी गार्ड कडुन मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रम नंतर प्रभारी अधिकारी यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमात उप पोस्टें व्यंकटापुर हद्दीतील 250 ते 300 नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.उपस्थित सर्व नागरीक व विद्यार्थी करीता अल्पोपहार चाय ची व्यवस्था करण्यात आली.