
*एटापल्ली तालुक्याचे भाजपाचे महामंत्री म्हणून संपत पैडाकुलवार यांची नियुक्ती*
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली
एटापल्ली: भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) एटापल्ली तालुका महामंत्रीपदी संपत पैडाकुलवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असलेले आणि विविध पदांवर काम केलेले संपत पैडाकुलवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांपासून ते भाजपच्या युवा मोर्चात कार्यरत होते.युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, महामंत्री आणि मागील सात वर्षांपासून ते युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम पाहत होते.
त्यांच्या योगदानाला आणि निष्ठावान कार्याला लक्षात घेऊन आता पक्षाने त्यांना मुख्य संघटनेत महामंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे.
संपत पैडाकुलवार यांच्या नियुक्तीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.त्यांच्या या नव्या प्रवासासाठी भाजपच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.