गडचिरोली जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के.
गडचिरोली:- जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात आज सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 5.3 किश्टर स्केल आहे. मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सध्याच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारचे नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने.
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे.या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.