टेकमपल्ली क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांना अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
अहेरी, प्रतिनिधी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेकमपल्ली येथे युवा वर्ग स्पोर्टींग क्लबच्या वतीने भव्य खुले टेनिस (लाईट) बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षीस प्रदान करण्यात आले. प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक मार्कंड ग्रामपंचायत उपसरपंच सुनीता अतुल कतलाम, तृतीय पारितोषिक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंतू मडावी आणि चतुर्थ पारितोषिक जि.प. प्राथमिक शाळा टेकमपल्ली शिक्षकवृंद यांनी दिले.
स्पर्धेत अनेक संघांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक फॉरेस्ट टायगर आलापल्ली, द्वितीय स्व. बालाजी सिडाम इलेव्हन टेकमपल्ली, तृतीय क्रेझी इलेव्हन गडबामणी तर चतुर्थ रफ्तार सी.सी. अहेरी संघाने पटकावला.
यावेळी दीपक नैताम, दिवाकर नैताम, विश्वनाथ आलाम, ज्ञानेश्वर सिडाम, गुणकर नैताम, खुशाल सिडाम, दिवाकर मडावी (माजी सरपंच, नागेपल्ली), महेश नैताम यांच्यासह स्थानिक नागरिक, क्रीडाप्रेमी तसेच काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
