भावनिक वातावरणात धोटे कुटुंबियांचे सांत्वन — अरविंद भाऊ कात्रटवार यांची मदतीची ग्वाही
गडचिरोली, मौशिखांब (प्रतिनिधी) : मौशिखांब येथील कैलास धोटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे धोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून मौशिखांब–मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद भाऊ कात्रटवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धोटे कुटुंबियांच्या घरी भेट देत स्वर्गीय कैलास धोटे यांच्या पत्नी कविता धोटे यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत देत “मी व माझे सहकारी धोटे कुटुंबियांच्या सदैव पाठीशी उभे राहू” अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी अरविंद भाऊ कात्रटवार मित्रपरिवारातील यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापले, दीपक लाडे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, प्रकाश भजबुजे, अमित हुलके, सुरेश वाघाडे, अमर सोरते, प्रशांत ठाकूर, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, कैलास लाडे, दीपक राऊत, रोशन कोरते, विश्वनाथ भानारकर, जगदीश खेवले, कवडू खेडेकर, आशिष निकुरे, अमोल मेश्राम, मयूर मेश्राम, किशोर म्हशाखेत्री, मोहन ठाकरे, नवनीत मेश्राम, विलास नैताम, दीपक वलादे, जीवन कुरुडकर तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धोटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
