पेरमिली येथे तक्षशिला बुद्ध विहार यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी.
पेरमिली(अहेरी):- पेरमिली येथे तक्षशिला बुद्ध विहार पेरमिली यांच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी करण्यात आले होते यावेळी पुरुषाने कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त केले असेल तर पुरुष कोणत्याही क्षेत्रात मोठ्या पदाच्या व कोणत्याही क्षेत्रात मोठे यश प्राप्त असेल तर त्यांच्या मागे स्त्रीचा हात असतो कारण ज्याप्रमाणे आपले मुलं लहान असताना त्यांना चांगलं संस्कार देऊन लहान याचे मोठे करून त्यांना चांगले संस्कार घडवितात तसेच लग्न झाल्यावर महिला आपल्या पतीला देखील चांगले मार्गदर्शन करून आपले कुटुंब चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी महिलाच पुरुषांना घडवू शकतात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता संगीता चांदेकर प्रमुख पाहुणे स्थानी बोलत होते. अध्यक्ष म्हणून गिरजा दुर्ग हे होते दीप प्रज्वलन म्हणून अनुसया डोंगे, गिरजा दुर्गे, सुमनबाई मेश्राम, सुरेखा दुर्गे, भावना दुर्गे, लतिका दगावकर, अस्मिता कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर निबंध स्पर्धा घेण्यात आले. आणि प्रथम द्वितीय आणि तृतीया क्रमांक पटकाविला विद्यार्थ्यांना शील्ड व रोख रक्कम देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत दुर्गे यांनी केले आभार प्रदर्शन अविनाश कोंडागुर्ले यांनी मांडले.
