
*भगवंतराव महाविद्यालयात राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त मार्गदर्शन*
*एटापल्ली:* भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे 1 ऑक्टोबर “राष्ट्रीय रक्तदान दिना”निमित्त पोलीस स्टेशन एटापल्ली आणि भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रक्तदान दिन साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बि.डी. कोंगरे, डॉ.व्हि.ए. दरेकार, श्री. ज्ञानेश्वर कोल्हे (पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन, एटापल्ली), डॉ. निलेश दुर्गे (विद्यार्थी विकास अधिकारी), श्री. राघवेंद्र सुल्वावार( माजी बांधकाम सभापती, नगरपंचायत एटापल्ली) श्री. राहुल कुडमेथे (नगरसेवक, नगरपंचायत एटापल्ली), प्रा. भारत सोनकांबळे, डॉ. श्रुती गुब्बावार (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), प्रा. चिन्ना पुंगाटी (रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), प्रा.राहुल ढबाले, प्रा. अतुल बारसागडे, श्री. प्रभाकर नाईक ( पोलिस हवालदार) इत्यादी उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय रक्तदान दिनानिमित्त मार्गदर्शन आणि रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय रक्तदान दिनाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.जनाधन नलावार ता. प्रतिनिधी एटापली