
*बेडगाव शाळेने बांधला वनराई बंधारा*
*कोरची:- जितेंद्र सहारे*
बेडगाव येथीलजिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बेडगाव व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहगाव नाला ला वनराई बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा हे संदेश विद्यार्थ्यांनी दिला. एकूण 200 खाली सिमेंट बोरीत रेती भरून बंधारा मजबूत बांधल्याने पालतू तथा जंगली जाणवरांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल असे मत वनपरिछेत्रधिकारी ठाकरे यांनी प्रत्येक्षात भेट देऊन मार्गदर्शन केले. याच नाल्यावरून बेडगांव ला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याची पातळी वाढेल असे सरपंच चेतन किरसाण यांनी मत व्यक्त केले.बंधारा बांधण्यासाठी प्रचार्य . एस. बी. उसेंडी, ठाकरे वनपरीछेत्र अधिकारी, वनरक्षक मसराम,सरपंच चेतन किरसाण, उप सरपंच देविदास गुरनुले, पंढरी कुरसुंगे, मधुकर प्रधान, राकेश पारडवार अध्यक्ष तंटा मुक्ती समिती, दिलीप कुरसुंगे महाराज,प्रा. गणेश सोनकलंगी,मनोज बनसोड, विजय मसराम, राकेश गायकवाड, मेघशाम कोसरे प्रा. काजल मडावी, प्रा. श्रीती भैसारे, नेहा लिमजे, वालदे मॅडम,जिजा खुणे व शिला नैताम यांनी सहकार्य केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.