आष्टी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिपक रॉय तर सचिवपदी सुधीर फरकाडे
आष्टी( प्रतिनिधी) ग्रामीण पत्रकार संघ आष्टी ची सर्वसाधारण सभा येथील विश्राम गृहामध्ये घेण्यात आली. याप्रसंगी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा घडून आली .
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार यांच्या माध्यमातून समाजातील अनेक समस्या सोडविण्याचा व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची ठरली आहे. अशा विविध समस्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांसमोर आणली जाते त्यासाठी पत्रकार संघ मोलाचे कार्य करते.या उद्देशाने याच सभेमध्ये २०२६ – २७ साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार सर्वानुमते नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.यात
अध्यक्ष म्हणून दिपक रॉय यांची तर सचिवपदी सुधीर फरकाडे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष – अशोक खंडारे , सहसचिव – संजय भोयर , कोषाध्यक्ष – गणेश शिंगाडे , सदस्य – भास्कर फरकडे , संदीप जोरगलवार यांची निवड झाली.
ही कार्यकारिणी एक वर्षासाठी असून १५ जानेवारी २०२६ ते १४ जानेवारी २०२७ पर्यंत कालावधी राहील .
