पेरमिली येथे 17 नोव्हेंबरला दसरा गडी पूजेचा भव्य सोहळा; आदिवासी संस्कृतीचा होणार जागर!
पेरमिली येथे 17 नोव्हेंबरला दसरा गडी पूजेचा भव्य सोहळा; आदिवासी संस्कृतीचा होणार जागर!
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन; अध्यक्षस्थानी बोडाजी गावडे, विशेष अतिथी संजय सडमेक यांची उपस्थिती.
पेरमिली (ता. अहेरी, जि. गडचिरोली) :-
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेल्या पेरमिली येथील दसरा पारंपरिक गडी पूजा सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती आणि पूर्वजांच्या परंपरांचा जागर होणार असून, परिसरातील 40 हून अधिक गावांतील नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
पेरमिली गडी पट्टी येथे सायंकाळी 4 वाजता पारंपरिक पूजाविधीला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोडाजी गावडे (भूमिया) राहणार असून, विशेष अतिथी म्हणून संजय सडमेक (गडी शेंडा) उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रेला पाटा, ढोल नृत्याने रंगणार सांस्कृतिक सोहळा.
आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी, धार्मिक विधी आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पारंपरिक आदिवासी रेला पाटा, ढोल नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि समाजबांधवांच्या सामूहिक सहभागातून आदिवासी संस्कृतीचे वैभव अनुभवायला मिळणार आहे. नव्या पिढीला आपल्या पूर्वजांच्या परंपरांची ओळख व्हावी, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे.
पेरमिली इलाका पट्टी समितीचे पदाधिकारी
कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष बालाजी गावडे, उपाध्यक्ष प्रमोद आत्राम व बंडू तलांडी, सचिव अमरनाथ गावडे, सहसचिव विजय आत्राम, कोषाध्यक्ष संदीप गावडे यांच्यासह कल्पना तलांडी, महारू तलांडी, लक्ष्मण कुडमेथे, वारलू तलांडी, पाडाळी पल्लो, रितेश गावडे, मासा तलांडी, इरपा तलांडी, राजक्का आत्राम, देवे आत्राम आणि कमला तलांडी परिश्रम घेत आहेत.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला डॉ. गणेश मडावी, सांबया करपेत (माजी सरपंच, कमलापूर), डॉ. अमोल कुकुडकर (वैद्यकीय अधिकारी, पेरमिली), नरेश चाके (वनपरिक्षेत्र अधिकारी, पेरमिली), योगेश तपकीर (प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन पेरमिली), निलेश वेलादी (माजी सरपंच, मेडपल्ली), राजू आत्राम (माजी सरपंच, पल्ले), रामरेड्डी बंडमवार (माजी जिल्हा परिषद सदस्य), प्रशांत ढोंगे (माजी पंचायत समिती सदस्य), व्यंकटेश तलांडी (माजी सरपंच, आरेंदा), राजू बोमनवार (माजी पंचायत समिती सदस्य), शिवा गरगम, वासुदेव कोडापे, कीसटू गड्डमवार, सत्यनारायण येगोलपवार, बालकृष्ण पडालवार, सत्यनारायण चंदनखेडे आणि सिताराम मडावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रतिष्ठित नागरिकांनाही निमंत्रण
पेरमिली गावातील विठ्ठल मेश्राम (पाटील), देवाजी सडमेक, बापू सडमेक, सद्गुरू नेताम, यशवंत मडावी, रघुनाथ मेश्राम, साजन गावडे, भिमजी कोडापे, देवराव मडावी, शंकर गावडे, बिच्चू मेश्राम, सिताराम मडावी, राहुल गावडे (पल्ले), रैनू आत्राम (रापल्ली), बोद्दा तलांडी, बंडू तलांडी (कुरुमपल्ली), संतु गावडे आणि भिमराव सडमेक यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
40 हून अधिक गावांतील नागरिकांचा सहभाग
या सोहळ्यासाठी पेरमिली, आलदंडी, चंद्रा, चंद्रा टोला, कोरेली बु., मेडपल्ली, कच्चलेर, कोरेली खु., कासमपल्ली, गुर्जा बु., वेडमपल्ली, तुमिरकसा, तलवाडा, आरेंदा, चौडमपल्ली, येरमनार, पल्ले, रापल्ली, सकीनगट्टा, मिरकल, कोरेपल्ली, कवटाराम, गुर्जा खु., मिचगुडा, ताडगुडा, कपेवंचा, एकरा, कोडेसपल्ली, कोडेकसा, पालेकसा, नेनेर, मदगु, आसा, कोदावाही, पिडीगुडम, पैमा, मंगुठा, बोरी, गट्टेपल्ली आणि येलचिल आदी गावांतील नागरिकांना निमंत्रण देण्यात आले आहे.
सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प
गडी पूजा हा आदिवासी समाजाच्या परंपरा, श्रद्धा आणि अस्मितेशी जोडलेला महत्त्वपूर्ण सांस्कृतिक सोहळा आहे. अशा कार्यक्रमांमुळे विविध गावांतील समाजबांधव एकत्र येतात. सामाजिक बंधुभाव वृद्धिंगत होण्यासोबतच आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचते. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे : आयोजकांचे आवाहन.
पेरमिली इलाका पट्टीतील सर्व गावांमधील भूमिया, गायता, पेरमा, वद्दे तसेच समस्त समाजबांधव, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनी मंगळवार, दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी पेरमिली गडी पट्टी येथे आयोजित दुसऱ्या गडी पूजा सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आपल्या संस्कृतीचे जतन आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या भव्य सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन पेरमिली इलाका पट्टी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

