अहेरी तालुक्यापासून 70 किमी अंतरावर असलेल्या कम्मासुर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत!..
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले यांनी कम्मासुर गावाला भेट देत जाणून घेतली समस्या.
अहेरी(गडचिरोली):– अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कम्मासुर गावाची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अहेरीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या देचलीपेटा जवळील गावात अनेक मुलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले यांनी कम्मासुर गावाला भेट देत येथील समस्या जाणून घेतले.या गावात सिमेंट रस्ते नाहीत, नाल्यांची व्यवस्था नाही आणि वीजपुरवठा असूनही तो नसल्यासारखाच असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, देचली मुख्य रस्त्या पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कम्मासुर गावाच्या मध्यभागी एक मोठा नाला असून, त्यावर गेल्या 30 वर्षांपासून पुलाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही शासन व प्रशासनाकडून झालेली नाही.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता ठाकरे यांना विचारणा केले असता त्यांनी “व्ही.आर. नंबर तपासून पुढील कार्यवाही करू” असे आस्वासन देण्यात आले दरम्यान, माजी पालकमंत्र्यांना अहेरी येथे एका कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता, त्यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
गावकऱ्यांच्या मते, अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर येत्या 15 दिवसांत कम्मासुर गावाच्या विकासासाठी काम सुरू झाले नाही, तर जिम्मलगट्टा क्रॉसिंग येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.असा इशारा गावकरी पत्रकातून केली आहे.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले, भाजपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार जावेद अली, महेश अलोणे आणी सुवर्ण महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा पत्रकार इन्नू पठाण हे उपस्थित होते.
