*पेठा येथे भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.*
*माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती.!*
*एटापल्ली:-* तालुक्यातील पेठा येथे जय पेठाखंडी क्रीडा मंडल यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,यांच्या हस्ते झाले.तर कार्यक्रमाचे सह-उद्घाटक म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना राजे साहेब म्हणाले की “युवा हेच भारत देशाचे भविष्य आहेत.युवकांना शिक्षणा सोबतच खेळालाही तितकेच महत्त्व आहे.खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो.युवकांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आपल्या क्षेत्राचे नाव लौकिक करू शकतात.खेळासाठी मी नेहमी मदत व सहकार्य करण्यास तयार आहे.पदावर नसतानाही जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.”असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ.वनिताताई नरोटी,प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच प्रशांत भाऊ आत्राम,तालुका अध्यक्ष प्रसाद भाऊ पुलूरवार,ग्रा सदस्य सौ.प्रतिभाताई तोडेवार, जिल्हा सचिव मोहन भाऊ नामेवार,योगेश कुमरे,भाऊजी बोगामी पोलीस पाटील, दस्सा कोरामी तसेच गावातील नागरिक,महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संचालन उसेंडी सर तर आभार प्रदर्शन देवाजी गोटा यांनी केले.
