*पत्रकार दिनानिमित्त एटापल्ली येथे भव्य कार्यक्रम*
*एटापल्ली*
एटापल्ली येथे पत्रकार दिनानिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अमर राऊत (भा.प्र.से.), तहसीलदार हेमंत गागुर्डे, नगराध्यक्ष रेखाताई मोहुर्ले, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन कदम, गटविकास अधिकारी डाॅ. आदिनाथ आंधळे, गटशिक्षणाधिकारी रुतिकेश बुरडकर, बालविकास अधिकारी बुरीवार, संस्कार संस्थेचे संस्थापक विजय संस्कार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार, लॉयड्स कंपनीचे नेतृत्व DySP शिंदे यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर प्रास्ताविक तनुज बल्लेवार व प्रशांत मंडल यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्य, पत्रकारांची भूमिका व समाजातील जबाबदारी यावर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्य मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी अमर राऊत यांनी पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत, पत्रकार व शासन यांच्यातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. सत्य, निर्भीडपणा व जबाबदारी या मूल्यांवर पत्रकारितेची उभारणी होत असून, समाजाच्या हितासाठी पत्रकारांनी सतत सजग राहावे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी नगराध्यक्षा रेखाताई मैहुर्ले, sdm अमर राऊत, पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष रविंद्र रामगुंडेवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही पत्रकारितेचे महत्त्व, ग्रामीण भागातील पत्रकारांची अडचण व त्यांच्या योगदानावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग व उपस्थित पत्रकारांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाचा समारोप विनोद चव्हान यांनी मान्यवरांचे, उपस्थित पत्रकारांचे व सर्व सहकार्यांचे आभार मानून केला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व सकारात्मक वातावरणात पार पडला
