मार्कंडा (कंन्सोबा) येथील सामाजिक कार्यात धावून जाणारा माणूस हरपला; विस्तारी नागुलवार यांचे निधन
चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (कंन्सोबा) येथील रहिवासी विस्तारी आशन्ना नागुलवार, वय वर्षे 80 रा.मार्कंडा (कं) यांचे आज दिनांक रात्रो 12.10 वाजता आकस्मिक निधन झाले. विस्तारी नागुलवार हे नेहमी गावातील सामाजिक कार्यात सहभागी होणून कोणताही दुजाभाव न करता सक्रिय राहत होते आणि गावातील शारदा विसर्जन उत्सवात तर त्यांनी कमालच करुन दाखवायचे प्रत्येक वर्षी हनुमान, वाघ, अस्वल,असे अनेक रुप धारण करून गावाची शोभा वाढवायचे आणि आष्टी शहरात तर मार्कंडा कंन्सोबा येथील शारदा मातेच्या दर्शनासाठी व खास करून विस्तारी नागुलवार हे या वर्षी काय बनून येतात हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जात होती. आता अशा मनमिळावू स्वभावाचे विस्तारी नागुलवार यांच्या आकस्मिक निधनाने गावात व आष्टी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता राकेश विस्तारी नागुलवार,रा.मार्कंडा(कं) यांचे घरुन आष्टी नदी घाटावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.
