जितेंद्र सहारे कोरची प्रतिनिधी
*कोचीनारा येथे सस्वर मानस गायन प्रतियोगिता उत्साहात संपन्न*
*दोन दिवस संपूर्ण कोचीनारा झाले राममय*
*मागील वीस वर्षांपासून निरंतरपणे कोचिनारा येथे सस्वर मानस गायन प्रतियोगिता चे उत्साहात आयोजन*
*कोरची :-* मागील वीस वर्षापासून निरंतरपणे कोरची तालुक्यातील कोचीनारा येथे जय मा दंतेश्वरी मानस परिवार तर्फे दरवर्षी सस्वर मानस गायन प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात दोन दिवसीय सस्वर मानस गायन प्रतियोगिता पार पडली.
या सस्वर मानस गायन प्रतियोगितेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल उपस्थित होते. यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सदाराम नूरुटी, नगरसेवक नसरुद्दीन भामानी, भागीरथ कुवर, रामसुराम काटेंगे, डॉ. शैलेंद्र बिसेन, घनश्याम अग्रवाल, दिलीप मडावी, आनंद चौबे, रूपराम देवांगण आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी छत्तीसगडून आलेले एकूण 20 मंडळींनी या दोन दिवसांमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि येणाऱ्या प्रत्येक मंडळींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिला मंडळी मध्ये जय दंतेश्वरी महिला मानस परिवार टोकरी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर श्री सुरशृंगार मानस परिवार गाथापार यांनी पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
महिला गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले तर पुरुष गटांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम पुरस्कार मंडळातर्फे देण्यात आले. यावेळी उत्तम व्याख्याकार, गायन, संगीत आणि तबला असे विविध विशेष पुरस्कार सुद्धा देण्यात आले.
कार्यक्रमाचे समापन 28 तारखेला करण्यात आले यावेळी विजेते मंडळींना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सदर समापन कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल होते तर उपाध्यक्ष म्हणून राहुल अंबादे आणि विशेष अतिथी म्हणून श्यामकुमार यादव, प्रा. प्रदीप चापले, जीवन भैसारे, भास्कर ठोंबरे, पंधरे, हिरामण मेश्राम, रुपराम देवांगन आधी उपस्थित होते
जय मा दंतेश्वरी मानस प्रचार समिती कोचीनारा चे अध्यक्ष समशेर खान पठाण, मानस प्रचार समितीचे सदस्य, समस्त गावकरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आणि सदर कार्यक्रम हे अत्यंत शांततेत व सुव्यवस्थेत पार पडले. सदर कार्यक्रमात मंच संचालन हिरामण मेश्राम यांनी तर निर्णायकाची भूमिका जीवन भैसारे व पंधरे यांनी पार पाडली.
