
पेरमिली:- जिल्ह्यात दारूबंदी असताना पेरमिली गावातील काही नागरिक अवैद्य रीतीने देशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती अहेरी तालुक्यातील पेरमिली पोलिसांना मिळाली.त्यानुसार अवैध देशी दारूचे विक्री करणाऱ्यावर धाड टाकून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.22 मे रोजी पेरमिली उप पोलीस स्टेशन हद्दीतील आरेंदा गावात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धाड टाकण्यात आली.यात दिलीप दुर्गे रा. आरंदा त्याच्या घरातून एकूण 90 ML मापाच्या 471 निपा किंमत 32,970 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दि.6 जून रोजी पेरमिली पोलीस गस्तीवर असताना पेरमिली-आलापल्ली रस्त्यावर वाहनांच्या चौकशी दरम्यान हनुमान लोणारे रा.आलापल्ली हा बीना नंबर प्लेट ची दुचाकीने देशी दारू वाहतूक करताना आढळले. त्याच्याकडून 5500 रुपयांचा देशी दारू व दुचाकी किंमत अंदाजे 90,000 रुपये असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
दि. 7 जून रोजी पेरमिली गावात पोलिसांनी धाड टाकले असता कोंडू दहागावकर रा.पेरमिली यांच्या घरून 7000 रुपयाचा दारू जप्त करण्यात आले.
सदर झालेल्या कारवाईत दुचाकीसह 1,35,470 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर दारू विक्रेत्यावर कलम 65 इ व कलम 83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्यन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईत उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने, पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन,पोहवा शंकर गर्गम, पोशी संदीप ठवकर, पोशी गणेश भर्रे, पोशी सारय्या गंधमवार हे होते.