
कूरखेडा(गडचिरोली):- तालुक्यातील कुरखेडा येथे स्थानिक मुस्लिम समाज मंडळाचा वतीने दि .१४ एप्रील रोजी सकाळी १०.३० वाजता क्रांतीसुर्य महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ व्या जयंती निमित्त प्रशंसनीय व आदर्श उपक्रम राबवित डॉ.आंबेडकर चौकात असलेल्या बौद्ध विहारात भगवान गौतम बूद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचे दर्शन घेत द्विप प्रज्वलित करण्यात आले.
शहरात सर्व धर्मीय नागरिक नेहमीच एकमेकांचा सन- उत्सवात, सूख- दूखात सहभागी होत असतात.हीच परंपरा कायम राखण्याकरीता मुस्लिम समाजाचा वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आले. विहारात उपस्थित बौद्ध समाज बांधवाना मुस्लिम समाजाचा वतीने निळा धार्मिक ध्वज सन्मान प्रदान करण्यात आले व जयंतीचा शूभेच्छा देत मिठाईचे वितरण सूद्धा करण्यात आले. याप्रसंगी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख माजी अध्यक्ष अयुब खान,वलीअहेमद खान, साजीद शेख,आसिफ शेख, रियाज़ शेख, शहेबाज शेख, यूसुफ पठान,सादिक शेख, सिराज पठान, जावेद शेख तसेच मुस्लिम बांधव हजर होते.