गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील बंगाली गावांमध्ये माजी खासदार अशोक नेते यांनी सभा घेऊन प्रचार केला, ज्यामुळे बंगाली समाजाने मोठे सहकार्य केले. या सहकार्यामुळे भाजपाचा विजय अधिक सुकर झाला.असे मत मा.खा. अशोक नेते यांनी व्यक्त केले.
विजयी रॅलीत प्रमुख नेत्यांची उपस्थिती
विजयी रॅलीत नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासोबत माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर यांच्यासह मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,सहकार आघाडी चे जिल्हाध्यक्ष आशीष पिपरे,जेष्ठ नेते सुधाकर येंनगदलवार, गजानन येंगदलवार, अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण,संजय बारापात्रे, शहराध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, वर्षा शेडमाके,पल्लवी बारापात्रे आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
नेतृत्वाचे कौतुक.
मा.खा. अशोक नेते यांनी डॉ. मिलिंद नरोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.गडचिरोलीतील विजयाने भाजपाच्या संघटन कौशल्याला आणि नेत्यांच्या परिश्रमांना नवा आत्मविश्वास दिला आहे.गडचिरोलीतील हा विजय केवळ भाजपाचाच नाही, तर जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे म्हटले आहे.