
येरमनारच्या नाल्यात आढळले वाघाच्या पायाचे ठसे.
पेरमिली – येरमनार परिसरात भीतीचे वातावरण.
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील पेरमिली जवळील येरमणार च्या नाल्यात वाघाच्या पायाचे पगमार्क (पायाचे ठसे) दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पेरमिली वरून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या येरमनारच्या नाल्यातून येरमनार येथील काही शेतकरी गाई चारण्याकरिता जंगलात नेत असताना नाल्यात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. नाल्यात वाघाच्या पगमार्क दिसल्याची बातमी वाऱ्यासारखे पसरताच या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
24 सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील खांदला राजाराम येथील रहिवासी शिवराम गोसाई बामनकर (वय 76) या वृद्धावर वाघाने हल्ला केल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तोच हल्ला केलेला वाघ हा येरमनारच्या दिशेने आला असावा असा अंदाज येथील नागरिकांनी वर्तवली आहे. सदर माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.