
येनापुर येथे दिवसढवळ्या घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास आष्टी पोलीसांनी केली अटक
आष्टी,
दिनांक २८/०७/२०२५ रोजीचे सकाळी ११/०० वाजता ते ०२/३० वाजताच्या सुमारास आष्टी ते चामोर्शी महामार्गावर असलेल्या मौजा येनापुर येथील मायाबाई माधव अलचेट्टीवार ही शेतावर घराला कुलूप लावुन रोवण्याकरीता गेले या संधीचा फायदा घेवुन दिवसढवळ्या अज्ञात चोरट्याने घराचा कुलुप तोडुन घराच्या आतमध्ये प्रवेश करुन गोदरेज आलमारी मध्ये असलेले नगदी १५०००/- रुपये तसेच १,०००००/- रुपये किंमतीची एक तोळ्याची सोन्याची काडीपोत व शेजारील फिर्यादीचे मावसभाऊ याचे मावस सासरे विस्तारी नागन्ना मेकर्तीवार यांचे घराचे दरवाज्याचा ताला तोडुन घराचे आतमध्ये प्रवेश करुन टिनाचे पेटीमध्ये ठेवून असलेले नगदी १०,०००/- रुपये व १३,०००/- रुपये किंमतीचा ओपो कंपनिचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ७८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्यावरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यातील घटनास्थळावर आरोपीने कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपीचा शोथ घेणे पोलीसांपुढे आव्हान होते. गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून निलोत्पल पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात दोन वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथकांनी तांत्रीक पुराव्याच्या मदतीने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा अत्यंत कसोशिने शोध घेवुन आरोपी नामे निकेश देविदास मेश्राम वय २८ वर्ष, रा. लखमापुर बोरी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली ह. मु. वंजारी मोहल्ला गडचिरोली यास दिनांक १२/०८/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल सोने, नगदी २५,०००/- रुपये रक्कम व २ मोबाईल तसेच मोटारसायकल जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात निलोत्पाल पोलीस अधीक्षक गडचिरोली, सत्यसाई कार्तीक अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी, अजय कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोनि. विशाल काळे. पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आष्टी, गोकुलदास मेश्राम पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदर रतन रॉय, भाऊराव वनकर, पोलिस शिपाई रविंद्र मेदाळे, संतोष नागुलवार, साजन मेश्राम, अखिल श्रिमनवार तसेच त्यांचे सहकारी टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.